कोरोना लक्षणांमध्ये ‘या’ आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषत: कोरोना संबंधित नाहीत. कारण फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता बिघडते. परंतु ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. ही लक्षणं आढळल्यास त्यानुसार, त्वरीत उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते. कोरडा खोकला, ताप, श्वसनविषयक समस्या, अशी कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणं आहेत. त्याशिवाय सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, घसा सुजणं, घशाला सूज येणं, घसा खवखवणं, अतिसार, धाप लागणे, कफ, थकवा येणं ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात.

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment