हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली गेली आहे. या तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115 रुपयांनी कपात केली आहे. यानंतर देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती कमी खाली आल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, 6 जुलै 2022 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. ज्यानंतर कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 1 नोव्हेंबरपासून कमर्शिअल गॅस सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तसेच 19 किलो वजनाच्या सिलेंडरवर नवीन किंमत लागू होईल, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. LPG Price
सलग पाचव्या महिन्यात झाली कपात
जुलैपासून सरकारी तेल कंपन्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात करत आहेत. ज्यामुळे सलग पाचव्या महिन्यात त्याचे दर कमी झाले आहेत. आता या ताज्या कपातीनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 1,696 रुपयांवर आली आहे. याशिवाय कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 1,744 रुपये, कोलकात्यात 1,846 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,893 रुपयांवर पोहोचली आहे. LPG Price
पाच महिन्यांत LPG सिलेंडर 257 रुपयांनी स्वस्त
यापूर्वी सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर जुलैमध्ये 8.50 रुपये, ऑगस्टमध्ये 36 रुपये, सप्टेंबरमध्ये 91.50 रुपये आणि ऑक्टोबरमध्ये 25.50 रुपयांनी कमी केले होते. अशा प्रकारे गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी कपात आहे. तेल कंपन्यांनी गेल्या पाच महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 257 रुपयांची मोठी कपात केली आहे. यामुळे रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर जेवण स्वस्त होऊ शकते. LPG Price
स्वयंपाकाच्या गॅसमध्ये दिलासा नाही
एकीकडे सरकारी तेल कंपन्यांनी सलग पाच महिने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात सुरू ठेवली आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे दर जुलैपासून स्थिर आहेत. दिल्लीत सध्या 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर 1,053 रुपयांना उपलब्ध आहे, तर मुंबईत त्याची किंमत 1,052.50 रुपये आहे. चेन्नईमध्येही एलपीजी सिलेंडरची किंमत 1,068.50 रुपयांना विकली जात आहे आणि कोलकात्यात सर्वाधिक 1,790 रुपये आहे. LPG Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा