हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही आर्थिक बदल होतच असतात. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होतो आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसहीत अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच या बदलाचाही आपल्या खिशावर मोठा परिणाम होईल.
गॅस सिलेंडर महागणार
हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानंतर किंमतीत बदल केले जातात. अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठेमध्ये गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सरकारने गॅसचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली होती, जी आज आपला रिपोर्ट जाहीर करणार आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरला पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. LPG Price
सीएनजी-पीएनजीच्या किंमतीही बदलतील
सरकारकडून दर 15 दिवसांनी CNG च्या किंमतींचा आढावा घेऊन त्यांच्या किंमतीत बदल केले जातात. अशातच जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो. 1 नोव्हेंबरपासून कंपन्या महानगरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. LPG Price
याचबरोबर पाईपद्वारे घरांना पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच सरकारने उद्योगांना स्वस्तात गॅस उपलब्ध करून देण्याची चर्चा देखील केली आहे. अशा परिस्थितीत कंपन्या रिटेल ग्राहकांकडून त्यांचा खर्च भरून काढू शकतात आणि पीएनजीच्या किंमतीही वाढू शकतात. LPG Price
ट्रेनच्या वेळेतही होणार बदल
हे लक्षात घ्या कि, 1 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेकडून अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केले जाणार असल्याचे म्हंटले आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 नोव्हेंबरपासून शेकडो ट्रेनच्या वेळेत बदल केले जातील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आधी 1 ऑक्टोबरपासून हे बदल केले जाणार होते, मात्र आता ते नोव्हेंबरपासून लागू केले जात आहेत. LPG Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price-in-maharashtra-s20.html
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा