हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : देशभरात 1 जून पासून पुन्हा एलपीजीच्या किंमती वाढू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्यांकडून एलपीजीचे दर ठरवले जातात. यावेळी घरगुती एलपीजीच्या किंमती 1100 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1002.5 रुपये आहे तर दिल्लीत 1003 रुपये तसेच कोलकात्यात 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1058 रुपये आहे.
मे महिन्यात गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजीच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी पहिल्यांदा सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजी पुन्हा 3.5 रुपयांनी वाढ करण्यात आली. म्हणजेच 1 महिन्यात एलपीजीच्या किंमतीत 53.5 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढणाऱ्या गॅसच्या किंमती पाहता 1 जून पासून कंपन्यांकडून पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. LPG Price
गॅसच्या किंमती वाढण्या मागील प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची वाढलेली किंमत आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होणे हे एक देखील कारण आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये खरेदी केली जाते. मात्र रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताला जास्त किंमत मोजावी लागते.LPG Price
भारतात आयात समानतेच्या किंमतीद्वारे एलपीजी गॅसची किंमत ठरविली जाते. त्याला IPP असेही म्हंटले जाते. भारतातील बहुतेक गॅस पुरवठा हा आयातीवर अवलंबून असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींनुसार IPP देखील ठरविला जातो. भारतातील LPG चे बेंचमार्क सौदी Aramoc ची LPG किंमत आहे. एलपीजीची किंमत ही केवळ गॅसची किंमत नाही. यामध्ये कस्टम ड्युटी, वाहतूक आणि इन्शुरन्स यासारख्या इतर घटकांचा देखील समावेश आहे.LPG Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html
हे पण वाचा :
ATM Card हरवले ??? कार्ड कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Dog Birthday In Pune University : बड्डे आहे भावाचा ; जल्लोष साऱ्या गावाचा !!!
Petrol-Diesel Price : राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये आणखी कपात केली जाणार ???
EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या