लग्न करण्यासाठी पठ्ठ्याने केला जबरदस्त कांड; मंडपाऐवजी पोहोचला जेलमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील कटनी या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. स्वतःच्या लग्नासाठी पैशाची गरज भासल्याने आरोपीने हि चोरी केली. या चोरीसाठी आरोपीने एक प्लॅनसुद्धा आखला होता. तो आमलात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये पाठवले. या आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कमेशिवाय मोबाईल, दुचाकीही जप्त केली. या आरोपीने कटनी जिल्ह्यातील बडवारा तालुक्यात मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून 1 लाख 27 हजार 212 रुपये चोरी केले होते. यानंतर बँकेचे मॅनेजर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या 72 तासांत अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाच्या आधारे रोहनिया गावातील सुभाष यादव या 29 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. हा व्यक्ती आपल्या मित्रांना पार्टी देत होता. यानंतर पोलिसांनी आरोपी सुभाषला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच बँकेत चोरी केली असल्याचे कबुल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नासाठी ही रक्कम चोरी केली होती. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे संधी मिळताच त्याने 6 आणि 7 जानेवारीला रात्री मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून त्यातून 1 लाख 27 हजार रुपये लंपास केले होते. चोरलेल्या रक्कमेपैकी पोलिसांनी 1 लाख 14 हजार रोकड आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल,तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बाईक, सुटकेस जप्त केली. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Comment