इंदौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदौरमधील बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा (Murder) पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मृताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 13 महिने लागले.
काय आहे प्रकरण?
एप्रिल 2021 मध्ये पोलिसांना जंगलात एक सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली होती. मृताचा केवळ सांगाडा उरला होता, परंतु त्याच्या कपड्यांचे काही भाग शिल्लक होते, त्या आधारे त्याच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली. त्याने हे आपले वडील जंगम सिंग असल्याचे सांगितले. त्यानंतर हा मृतदेह (Murder) जंगम सिंगचा असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. यानंतर पोलिसांनी जंगम सिंगच्या मुलाचा डीएनए नमुना घेतला आणि सांगाड्यातून सापडलेल्या डीएनए नमुन्यासह त्याची तपासणी केली असता तो एकमेकांशी मॅच झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आणि तपास सुरु केला.
13 महिन्यांनंतर आरोपींना अटक
यादरम्यान मृत व्यक्तीला त्याच्या दोन मित्रांसोबत शेवटचे पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी गेंदालाल आणि जगदीश या मित्रांच्या घरावर छापा टाकला असता, दोघेही बराच काळ गाव सोडून गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर अधिक संशय आला. मात्र, पाळत ठेवण्याबरोबरच इंदौरच्या आसपासच्या भागातही पोलीस आरोपींचा शोध घेत होते. अखेर 13 महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दारु पिण्यावरुन वादावादी
या आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी जंगम सिंगची हत्या (Murder) केल्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी ते दोघेही जंगम सिंगसोबत दारू पार्टी करण्यासाठी जंगलात गेले होते. त्याच वेळी दारू पिण्याच्या कारणावरून दोन्ही मित्रांशी त्याचा वाद झाला. त्यानंतर आरोपी गेंदालाल आणि जगदीश यांनी जंगम सिंगच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर हे दोघेही गावातून पळून गेले होते.
हे पण वाचा :
तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन
उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब