भोपाळ : वृत्तसंस्था – माणूस आपल्या रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही. आपण कधी कधी रागाच्या भरात मोठा गुन्हा करतो. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली आहे. यामध्ये एका वडिलांनी रागाच्या भरात मुलाची गोळी झाडून हत्या केली आहे. मुलाने लाईट बिल भरण्यास नकार दिल्याने बापाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले आहे.
हि घटना मध्य प्रदेशमधील छतरपूरमध्ये घडली आहे. आरोपी वडील हे निवृत्त लष्करी जवान आहेत. ते छतरपूर जिल्ह्यातील नौगावमधील आर्मी कॉलनीमध्ये राहतात. त्यांचे नाव तेज बहाद्दूर सिंह असे आहे तर मृत मुलाचे नाव सत्येंद्र सिंह बघेल, उर्फ सोनू असे आहे.
हि घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी सत्येंद्रला गावातील हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. शुल्लक कारणावरून वडिलांनी मुलाची हत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी तेज बहाद्दूर सिंहला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.