PNB सह ‘या’ सरकारी बँकामध्ये FD वर किती व्याज मिळत आहे गुंतवणूक करण्यापूर्वी येथे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सुरक्षित आणि रिस्क फ्री गुंतवणूकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) हा उत्तम पर्याय मानला जातो. म्हणून आजही लोकं त्यांची बचत बँकांमध्ये FD च्या रूपात जमा करतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही पीएसयू बँकां (PSU Bank) बद्दल सांगणार आहोत जे FD वर उत्तम व्याज दर देतात. हे व्याज दर 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीवर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटसचे आहे. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांना देखील FD वर अतिरिक्त व्याज मिळते.

ज्येष्ठ नागरिकांना FD वर अधिक व्याज मिळते
बहुतेक सर्व बँका ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांपेक्षा 0.5% जादा व्याज दर देतात. त्याच वेळी FD मधील डिपॉझिटर्सना बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दर मिळतो. तथापि, प्रत्येक बँकेत FD व्याज दर वेगवेगळे असतात. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेउयात …

Union Bank
Union Bank फिक्स्ड डिपॉझिटसवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक दीर्घ मुदतीच्या एफडीवर 5.60% व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 6.10% व्याज मिळत आहे. जास्त व्याज देण्यात कॅनरा बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दीर्घ मुदतीच्या एफडीवर 5.50% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.00% व्याज मिळत आहे.

SBI
7 दिवस ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडीवर वार्षिक 2.90% दराने SBI व्याज घेत आहे. दुसरीकडे, 46 दिवस ते 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3.90 टक्के, 180 दिवस ते 210 दिवसांपेक्षा आणि 211 दिवसांपेक्षा जास्त तर 1 वर्षापेक्षा कमी एफडी वार्षिक वर्षाला 4.40 टक्के व्याज मिळत आहे. 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षाखालील एफडीवर 5%, दोन वर्षांपेक्षा जास्त मात्र 3 वर्षांपेक्षा कमी एफडीवर 5.10%, 3 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी एफडीवर 5.30% आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.40 टक्के वार्षिक व्याज वर्षासाठी यावेळी लागू आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जादा व्याज दिले जात आहे.

PNB
7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी पंजाब नॅशनल बँक 3 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या मुदतीसाठी 3.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकासाठी 3.75 टक्के, 91 ते 179 दिवसांसाठी 4 टक्के, 180 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी 4.40 टक्के, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत 4.50 टक्के, 1 ते 3 वर्ष या कालावधीत 5.25 टक्के, 3 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.30 टक्के दराने व्याज दिले जाईल. बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जादा व्याज देत आहेत.

IDBI Bank
पंजाब आणि सिंध बँक डिपॉझिटर्सना दीर्घ मुदतीच्या एफडीवर 5.25% व्याज देत आहे. तसेच बँक ऑफ बडोदादेखील तेच व्याज देत आहे. या दोन्ही बँका ज्येष्ठ नागरिकांना 5.75% व्याज देतात. इंडियन ओव्हरसीज बँक 5.20%, इंडियन बँक 5.15% आणि आयडीबीआय बँक आपल्या ग्राहकांना लॉन्ग टर्म एफडी वर 5.10% व्याज देत आहेत. या तिन्ही बँकाही ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक व्याज देतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment