माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच आरोग्य सेवकाची नियुक्ती केली आहे. चीनमधील वुहान प्रांतातून करोना विषाणूचा संसर्ग होत आहे, मात्र याबाबत घाबरुन न जाता वेळेत उपचार करुन, संसर्गास प्रतिबंध करता येतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले यांनी सांगितले. खोकला, ताप आणि श्वसनास अडथळा निर्माण होणे ही करोना विषाणू संसर्गाची मुख्य लक्षणे ही लक्षणे आढळल्यास स्वता: उपचार करु नये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानुसार उपचार सुरु करावे असे आवाहन डॉ.प्रदिप ढेले यांनी केले आहे.

या आजारापासून दूर राहण्यासाठी साबण पाण्याने हात स्वच्छ धुवा, शिंकताना, खोकताना नाकावर, तोंडावर रुमाला धरावा. सर्दी, फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क टाळा. मांस, अंडी पूर्णपणे शिजवून, उकडून घ्या. जंगली अथवा पाळीव प्राण्याशी निकटचा संपर्क टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. संसर्गाची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा. असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत के.एल राहुलने घेतली मोठी झेप

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार

100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार