महाराष्ट्रात एमबीए सीईटीचा निकाल उद्या; उदय सामंत याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी २३ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलंय की, ‘MAH – MBA /MMS CET 2020 ही परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला १,१०,६३१ उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक- २३ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल.’ MAH-MBA/MMS CET 2020 परीक्षेचा निकाल आधी ३१ मार्च रोजी जाहीर होणार होता. मात्र राज्याच्या सीईटी कक्षाने हा निकाल लांबणीवर टाकला होता. १४ आणि १५ मार्च २०२० या दोन दिवशी ही परीक्षआ घेण्यात आली. ही संगणक आधारित परीक्षा होती.

इथे पहा निकाल
निकाल शनिवारी २२ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील. cetcell.mahacet.org हे सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. परीक्षानिहाय स्कोअर आणि एकूण स्कोअर दोन अंकी डेसिमल पॉइंट्समध्ये विद्यार्थ्यांना मिळेल. राज्यातील सर्व शासकीय व्यवस्थापन संस्था, विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित व्यवस्थापन संस्था आदींच्या प्रवेशांसाठी या सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात येतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment