Sunday, January 29, 2023

मी काय दुधखुळा नाही; पवारांबद्दलच्या प्रश्नावरून अजितदादा भडकले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत वापरलेल्या शब्दामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलं. मात्र या कारवाईनंतरही अजित पवारांनी संयमी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत खुद्द अजित पवारांनाच विचारलं असता ते थेट पत्रकारांवरच संतापले.

अजित पवार म्हणाले, शरद पवार नाराज आहेत हे धांदात खोटं आहे. हे तुम्हाला हे कोणी सांगितलं? पवार साहेबानी फोन करून सांगितलं आहे का? असा उलट सवाल अजित पवारांनी केला. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. पण मी रोज साहेबांच्या संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात कोणी अशी भर घातली? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांचीच शाळा घेतली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेता म्हणून माझं काम कस असाव हे मला कळत, मी काय दुधखुळा नाही. ३२ वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही, म्हणून अशाप्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण करता असेही अजित पवार म्हणाले.