व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गणपतीच्या ‘या’ मंदिरात आजही तेवतो अखंड नंदादीप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | अष्टविनायक गणपती पैकी चौथा गणपती असलेला महाडचा वरदविनायक हा गणपती पुण्याहून ८० किमी दूर मुंबईजवळ स्थित आहे. वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो असे अनेकजण मानतात.

वरदविनायक मंदिर आणि परिसर –

हे मंदिर अत्यंत साधंसुध असून या मंदिरात आपण गणपतीच्या अगदी जवळ जाऊन या गणपतीचे दर्शन घेऊ शकतो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यांनतर सर्व प्रथम रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती दिसतात. या गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजुंना चार हत्तीचे पुतळे आहेत. या मंदिराचा हॉल ८० फूट रुंद आणि ८० फूट लांब आहे. या गणपती मंदिराच्या  शिखराची उंची २५ फूट असून मंदिराचा कळस शुद्ध सोन्याचा असून त्याच्यावर नागाची नक्षी आहे. आपण तिथे गेल्यावर आपल्या हाताने गणपतीची पूजा करु शकतो. या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. तसेच या मंदिरात एक नंदादीप आहे. जो अखंड तेवत असतो, असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड तेवत आहे.

आख्यायिका –

राजकुमार रुक्ममंद एकदा शिकारीला जंगलात गेला असता. ऋषी वाचकमवी यांच्या आश्रमात राहीला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमारच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला. व तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरताना पाहून इंद्र राजकुमाराचे रूप घेऊन आला. त्यानंतर मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रित्समद नावाच्या मुलाला जन्म दिला. या मुलाला जेव्हा त्याच्या जन्माविषयी समजले. तेव्हा तो आपल्या आईला शाप देतो, आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती त्याला प्रसन्न होतो. व त्याला म्हणतो की तुला अतिशय धाडसी मुलगा होईल. त्याला केवळ शंकर हरूवू शकेल.

त्यानंतर ग्रित्समद याने गणपतीला येथेच कायमचा निवास करण्यास सांगितले. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रित्समद याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले, आणि तिथे गणपतीची स्थापना केली. तो गणपती आज वरदविनायक नावाने भारतभर प्रसिद्ध आहे.