हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर महायुतीत परतल्याने महाविकास आघाडी आणि शरद पवार याना मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांनी मला एक जागा दिली असून आपण त्यांचा आभारी आहे असं म्हणणाऱ्या जानकरांनी अवघ्या २४ तासांत कोलांटी उडी मारत महायुतीत एंट्री केली. जानकर यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला डबल धक्का देण्याची भाजपची रणनीती असू शकते. महादेव जानकर याना भाजपकडून एक जागा देण्यात येणार आहे. ती जागा बारामतीचीही असू शकते असं बोललं जात आहे. असं झाल्यास पवारांच्या होम पिचवर सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी महादेव जानकर याना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरवण्याची खेळी भाजप करू शकते.
2014 ला मोदी लाटेत महादेव जानकर यांनी सुप्रिया (Supriya Sule) यांना जोरदार लढत दिली होती आणि अगदी कमी फरकाने जानकर यांचा पराभव झाला होता.तेव्हा कपबशी चिन्हावर जानकर यांनी निवडणूक लढवल्यानं मुख्यतः भाजपचे पाठीराखे जे मोदी भक्त-चाहते विशेषतः खडकवासला या मतदारसंघातील त्यातील बहुतांश जणांनी नोटा वापरलं किंवा मतदानच केलं नाही कमळ चिन्ह नव्हतं म्हणून. यावेळी जानकर हे उमेदवार असतील तर कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे.
दुसरा एक महत्वाचा फायदा भाजपला होऊ शकतो तो म्हणजे, महादेवजानकर उमेदवार असतील तर विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांनी राहुल कुळ यांचा अजित पवारांना असणारा विरोध कमी होऊ शकतो. सुपरूया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदार संघात अर्ज भरणार आहे. शिवतारेंचा राग हा मुख्यत्वे दोन्ही पवारांवर आहे. अशावेळी जर महादेव जानकर भाजपकडून बारामती लोकसभा निवडणुकीत उतरेल तर विजय शिवतारे जानकरांना आपला पाठिंबा देऊ शकतात आणि महायुतीतील वाद संपुष्टात येतील.
मात्र सुनेत्रा या उमेदवार नसतील तर मानसिक दृष्ट्या पहिल्या फेरीत सुप्रियांनी मात केली असं मानता येईल. पवार कुटुंबियातील वाद एकेमेकांवरील टीका कमी होतील. कार्यकर्तेही मोकळा श्वास घेतील. अर्थात अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा होईपर्यंत चित्र पूर्ण स्पष्ट होणार नाही पण राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो.ऐनवेळी कुणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं, कुणाला मिळूही शकतं.