टेम्पो रिव्हर्स घेताना महिलेला जोरदार धडक, 60 वर्षीय महिला गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळच्या वसई शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका छोटा हत्ती टेम्पो चालकाने गाडी रिव्हर्स घेताना महिलेला चिरडले. यामध्ये हि महिला गंभीर जखमी झाली आहे. ड्रायव्हर सोसायटीच्या आवारात उभा असलेला छोटा हत्ती टेम्पो मागे घेत होता. यावेळी तो टेम्पो मागे घेत असताना मागून जाणाऱ्या महिलेला जोराची धडक बसली आणि ती महिला गंभीर जखमी झाली. या महिलेचा उजव्या बाजूचा खांदा आणि पाय फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर वसईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?
छोटा हत्ती टेम्पो चालकाने गाडी पाठीमागे घेताना 60 वर्षीय महिलेला जोराची धडक दिली आहे. हि महिला सोसायटी आवारात कचरा टाकून जात असताना त्याच सोसायटीमध्ये उभा असलेल्या छोटा हत्ती टेम्पो चालकाने टेम्पो पाठीमागे घेऊन या महिलेला जोराची धडक दिली. हि घटना वसई पूर्व भागातील गोकुळ पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे.

टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
या अपघातात हि वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. काकोली मित्रा असे या जखमी महिलेचे नाव आहे. या अपघातात तिचा उजव्या बाजूचा खांदा, पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सध्या या महिलेवर वसई पूर्वेच्या एव्हरशाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वालीव पोलिसांनी टेम्पो चालक, मालका विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment