नाना पटोलेचे काँग्रेससोबत खटकले ; पोलखोल यात्रा रद्द होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी|  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वाद घालत नाना पटोले यांनी भाजपला अखेरचा जय श्रीराम घातला. आपल्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसला जवळ केले. मात्र त्या पक्षात देखील त्यांचे चांगलेच वाजण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोले यांच्या पोल खोल यात्रेला काँग्रेस मधील काही नेत्यांनी अक्षेप घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात ज्या ज्या ठिकाणी आपली यात्रा घेऊन जाणार होते. त्या त्या ठिकाणी नाना पटोले त्यांची पोल खोल यात्रा घेऊन जाणार होते. त्यांच्या या यात्रेला काँग्रेस मधीलच काही नेत्यांनी आक्षेप घेतला असून नाना पटोले यांच्याबद्दल दिल्ली दरबारी तक्रार केली आहे. नाना पटोले पक्षाचे काहीच ऐकत नाहीत. स्वतःचे निर्णय स्वतः घेतात असा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींजवळ केला. त्यामुळे नाना पटोले आरोपीच्या पिंजरीत उभा राहिले आहेत.

दरम्यान नाना पटोले यांना या संदर्भात विचारले असता नाना पटोले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीला खडसावले आहे. आमच्याच पक्षातील गटबाजी आणि वाद तुम्हाला दिसतात का. शिवसेनेत आणि भाजपमध्ये असणारे अंतर्गत वाद तुम्ही माध्यमात का झळकवत नाही असे म्हणून नाना पटोले यांनी माध्यमांचीच हजेरी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाना पटोले काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

Leave a Comment