पुणे प्रतिनिधी | मस्ती तुझी जिरली , तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्या विरोधात उभा राहायचे होते. आधी तू मला आव्हान दिले , बापाचं नाव सांगणार नाही असं म्हणाला मग माझ्या विरोधात का उभा राहिला नाहीस अशी वादग्रस्त टीका अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.
आढळराव पाटील यांचा पराभवाने चेहरा काळवंडला म्हणाऱ्या अजित पवाराला मला सांगायचंय पोराचा पराभव झाला तेव्हा कोणाचा चेहरा काळवंडला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. त्यामुळे अजित पवारांनी माझ्यावर टीका करू नये असा सणसणीत टोला आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना लगावाला आहे. पवार घराण्यातील कोणीही माझ्या विरोधात उभा राहिले तरीही मी उमेदवारी करणारच होतो. कारण मला इथल्या मातीचा अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी येथील जनता अजून देखील माझ्या पाठीशी आहे. माझा पराभव पवार कुटुंबातील व्यक्तीने केला नाही. अथवा अमोल कोल्हेंनी देखील केला नाही. माझा पराभव हा संभाजी महाराजांच्या भूमिकेने केला आहे असे आढळराव पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी मागील काही दिवसापूर्वी आढळराव पाटील यांच्यावर त्यांचा पराभवाने चेहरा काळवंडला अशी टीका केली होती. त्यावर आज आढळराव पाटील यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीची शिवसेना काय अवस्था करते ते पाहण्याचे आव्हान अजित पवार यांना दिले आहे. आढळराव यांच्या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच वादळ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.