नागपूर : हॅलो महाराष्ट्र – भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत. हा अहवाल न्यायालयाने फेटाळलून लावला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणातील खरा सूत्राधार उघड होऊ नये यासाठी सरकार शुक्ला (rashmi shukla) यांना पाठीशी घालत असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याचबरोबर अध्यक्षही सरकारला पाठिशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला होता.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशीष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याबाबत पुणे पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला होता. मात्र हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत काही मुद्दय़ांवर तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारवर हल्ला चढविताना रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधिमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याचा आरोप केला. यामुळे विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे , कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले , आता रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करत आहे , ही माहिती सभागृहाच्या समोर आणण्याची मागणीसुद्धा अजित पवार यांनी यावेळी केली.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय