Saturday, January 28, 2023

केसांना कलर करताय मग थांबा ! अगोदर पहा ‘हा’ Video ; महिलेची झाली अशी अवस्था कि…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्त्रियांचं सौंदर्य केसांमुळे अधिक खुलत. शिवाय आपण सुंदर दिसावं म्हणून महिला केसांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे कलर लावत असतात. विशेष म्हणजे एखाद्या लग्न तसेच घरगुती कार्यक्रमात महिलांना जायचे असल्यास त्या चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांना कलर करतात. मात्र, केसांना कलर करणे किती महागात पडते. त्यामुळे आपल्याला केसही गमवावे लागतात त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेच्या केसांना कलर लावण्यात आला आहे. त्यानंतर त्या हेअर कलरच्या साईड इफेक्टमुळे हेयर आर्टिस्ट आणि तिथल्या कामगारांची चांगलीच धांदल उडाली आहे.

नेमकं घडलं असं की, एक महिला आपल्या केसांना हेअर कलर करण्यासाठी एका बलूनमध्ये गेली. त्याठिकाणी त्या महिलेच्या केसांना पुर्वीचा कलर होता. तिने त्यावर नवा कलर लावण्याचं सलूनमध्ये सांगितले. त्यानंतर तिथल्या हेयर आर्टिस्टने त्या कलरचं रसायन तयार करून तिच्या केसांना लावले. त्यानंतर महिलेच्या डोक्यात तिला जळल्यासारखे वाटू लागले. तिला ते सहन होत नसल्यामुळे ती ओरडू लागली.तिने तत्काळ हेयर आर्टिस्टला बोलावून होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली.

- Advertisement -

हेअर आर्टिस्टने तिचे केस धुण्यासाठी घेतले, परंतु केस इतके तुटून गेले. केस पुर्ण धुवून झाल्यानंतर त्या महिलेचे केस पुर्णपणे पांढरे झाले होते. त्या महिलेच्या केसाचं अधिक नुकसान झाले असून या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती अधिक व्हायरल झाला आहे.

सुरुवातीला त्या महिलेच्या केसांना पुर्वीचा कलर होता. तिने त्यावर नवा कलर लावण्याचं सलूनमध्ये सांगितले. मात्र, यावेळी घडलेल्या प्रकारामुळे आणि आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हेअर कलर करण्याबाबत महिला चांगलाच विचार करतील यात शंका नाही.