पालघर प्रकरणात चंद्रकांतदादांची उडी म्हणाले,गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. पालघर मधील मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक असून या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असंही त्यांनी या पत्रात लिहलं आहे.

पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः मुख्यंमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता, तरीही त्यांनी ४ दिवस वेळ लावला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच ठाणे येथे तरुणाला झालेल्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”.