12 वीचा निकाल उद्या होणार जाहीर

0
92
Maharashtra Board XII Result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. मात्र यावर्षी कोरोना आटोक्यात असल्याने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल काही जाहीर करण्यात आला नव्हता. आता तो जाहीर करण्यात येणार असून तो उद्या विध्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

उद्या दुपारी 1 वाजता निकाल लागणार असून हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboarit.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर, रोल नंबर, आईच नाव माहिती असणे आवश्यक आहे.

10 वीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

अशा प्रकारे चेक करता येणार निकाल

1. विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी.
2. यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.
4. यानंतर तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

किती वाजता जाहीर होणार निकाल?

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल 8 जूनला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जाहीर होणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here