मुंबई । लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणेच अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाहीमोठया संख्येत समावेश आहे. लॉकडाऊनमुळे काम ठप्प पडल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अडकून पडलेल्या बिहारचे काही मजूर अन्नाविना दिवस काढत असल्याचं कळातच तेथील स्थानिक आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवर त्यांनी या सर्व मजुरांची परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकत मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची २ मिनिटं २० सेकंदाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या नम्रतेचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या आमदाराला मजुरांच्या मदतीचे फक्त आश्वासन दिलं नाही तर ते पूर्णही केल. आमदार सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या मजुरांपर्यंत शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचं या मजुरांनी सांगितलं आहे. सरोज यादव यांनी या चर्चेसंबंधी बोलताना ८ ते ९ दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याचं सांगितलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही प्रोटोकॉल मोडून कोणतीही पूर्वसूचना नसताना एका आमदाराशी चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. आज जिथे आमच्या राज्यातील मुख्यमंत्री वारंवार विनंती करुनही बोलण्यास नकार देत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आमच्याशी चर्चा केली,” अशी भावना सरोज यादव यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरोज यादव यांच्यातील संभाषणाची हीच ती क्लिप..
https://www.facebook.com/388247148018023/videos/265488024641555/
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.