यूपीत साधूंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी केला योगी आदित्यनाथांना फोन; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उत्तर प्रदेशामधील बुलंदशहर येथे दोन साधूंच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर संपर्क साधत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या अमानुष हत्येवरुन चिंता व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई तसंच दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत”. “ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे. पालघरमध्ये चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून याबाबतची माहिती घेतली होती. आता उत्तर प्रदेशातच दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने राऊत यांनी सूचक असं ट्विट करत भाजपवर उपरोधिक टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment