संकट टळलंय या भ्रमात राहू नका! अजून लॉकडाऊन संपलेला नाही- उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याचा अर्थ लॉकडाऊन संपला आणि करोनाचं संकट टळलं असा होत नाही. लॉकडाऊन कायम असून करोनाचं संकट टळलंय या भ्रमातही राहू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी लॉकडाऊनमधून काही ठिकाणी थोडी शिथिलता दिल्यानंतर काही ठिकाणी लॉकडाऊन नसल्यासारखी गर्दी जमल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मला हे अजिबात चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खडसावलं. काही ठिकाणी केलेली ही थोडीशी शिथिलता आहे. याचा अर्थ लॉकडाऊन काढून टाकला असं नाही. लॉकडाऊन ३ मेपर्यंत राहणार आहे आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेच पाहिजे. शिथिलता म्हणजे बंधमुक्तता नाही. संकट टळलंय या भ्रमात राहू नका. लॉकडाऊन संपलेला नाही. तुम्ही लॉकडाऊन पाळला नाही तर अधिक घट्ट निर्बंध लागू करावे लागतील, असं सांगतानाच आपण जेवढी शिस्त पाळू, तेवढं या संकटातून लवकर बाहेर पडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांना लॉकडाऊनमधून थोडी सूट दिली आहे. त्यांनाही काही अटी घातल्या आहेत. राज्याचं रुतलेलं अर्थचक्र गतीमान करण्यासाठी आपण हळूहळू काम सुरू करत आहोत. गणपती बाप्पा मोरया म्हणून ही सुरुवात करत आहोत. ही केवळ ट्रायल आहे. आपण यावेळी कसं वागतो. त्याची ही चाचणी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment