मुंबई । महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ६८४ इतकी होती मात्र यात आणखी भर पडून ही संख्या २ हजार ८०१वर जाऊन पोहोचली आहे. काल रात्रीपासून ११७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या १२ तासात नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ६६, पुण्यातील ४४, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
Maharashtra: 117 new cases recorded today in the state, of which 66 are from Mumbai and 44 from Pune. The total number of positive cases in the state stands at 2801 now. pic.twitter.com/T3DgqUpRQm
— ANI (@ANI) April 15, 2020
कोरोनाने सर्वात जास्त उपद्रव मुंबईत आणला आहे. आज आढळलेल्या ६६ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यानंतर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार ८२२ इतका झाला आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यासोबत महाराष्ट्रातील कोरोनाच संकट आणखी गडद होत चाललं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाचे दुसरे हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात गेल्या १२ तासात २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा आता ३९ झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”