मुंबई । संपूर्ण देशात करोनान थैमान घातलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईलाजानं लॉकडाउनच कठोर पाऊल सरकारला उचलावं लागलं. ज्यामुळं संपूर्ण देश ठप्प झाला. लोक घरात बंद झाली. तर दुसरीकडे करोना दिवसेंदिवस आपले पाय पसरत चालला आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे,खोट्या बातम्या पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ३५ जणांना राज्यातील पोलिसांनी केली आहे. तर २८ जणांचा शोध सुरु आहे. अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी दिली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये खोट्या बातम्या, अफवा आणि विद्वेशपूर्ण गोष्टी म्हणजेच हेट स्पीचचा प्रसार सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या लोकांच्या विरोधात २० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची संख्या १३२ आहे आणि यापैकी ४९ या हेट स्पीच बाबत आहेत, अशी माहितीही राजपूत यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”