शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी |बीड जिल्हा शिवसेना प्रमुखाच्या चारा छावणीत बोगस जनावरे दाखवून सरकारी मदत लुटण्याचा प्रकार घडत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या छावणीत ८०० जनावरे बोगस दाखवून त्यांच्या नावे सरकारी मदत उखळली जात होती. प्रशासनाने या प्रकरणी चारा छावणीला भेट देऊन शिवसेनेचा जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पडले आहे.

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आलेल्या उपजिल्हाधिकाऱ्या सोबत येथील लोकांनी वादावादी केली. तसेच त्यांना छावणीची तपासणी करण्यास अटकाव देखील करण्याचा प्रयत्न झाला. यातूनच छावणीत काही तरी काळंबेरं असल्याचा महिला अधिकाऱ्याला संशय आला.

मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर पंतप्रधान होणार नाही

‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या चारा छावणीची देखरेख हि संस्था जरी करत असली तरी या संस्थेवर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याची एकछत्री सत्ता आहे. त्यामुळेच त्याच्याकडून अशा दमनतंत्राचा वापर केला जात होता. महिला अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोन वरून संपर्क साधला असता. जिल्हा पोलीस उपाधिक्षकांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी पोलीस फौज पाठवून दिली आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात चारा छावणीची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून चारा छावणीवर ८०० जनावरे बोगस असल्याचे सिद्ध झाले.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl

 

महत्वाच्या बातम्या 

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

Supriya Sule यांच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता