शरद पवारांच्या भेटीला महाराष्ट्र एकीकरण समिती; केली ‘ही’ विनंती

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कर्नाटक सरकारकडून सीमभागातील मराठी बांधवांवर सुरु असणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती यावेळी पवारांना दिली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत मागितली.

त्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेईल आणि यासाठी आपण प्रयत्न करु, असे ग्वाही यावेळी शरद पवार यांनी सदस्यांना दिली. त्यामुळे सीमाभागातील लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शरद पवार लवकरच राज्यातील सर्व खासदारांना एकत्र आणतील.

काही दिवसांपूर्वी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर चित्रदुर्गमध्येही भगवा ध्वज जाळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता कर्नाटकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचीही विटंबना केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यातील काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.