परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । निवडणुकीत उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रचाराचा कालावधी शनिवारी पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आज दिवसभरात परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ठिकठिकाणी जाऊन रॅली काढून वातावरण निर्मितीवर भर देऊन वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

आज सायंकाळच्या दरम्यान उमेदवारांनी ठिकठिकाणी रॅली काढून आपापल्या मतदार संघातील प्रचार संपवून मतदान करण्याचं आवाहन केलं. आता निवडणूक निकाल अंती मतदाता कोणाला कौल देणार हे लवकरच समजेल.

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.