मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी |रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात केलेला प्रवेश आणि त्यानंतर मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असा झालेला संघर्ष यामुळे चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने सर्व ताकदपणाला लावून निवडणूक लढली. तसेच मोहिते पाटील कुटुंबाने तर भाजपला मताधिक्य मिळवण्यासाठी सबंध मतदारसंघ पिंजून काढला. तरी देखील मोहिते पाटलांच्या मेहनतीला यश मिळणार नाही असा एक्सिट पोलचा अंदाज आहे.

आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका

मोहित पाटील भाजपच्या गोटात सामील होताच शरद पवार यांनी संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच संजय शिंदे याची मतदारसंघात संपर्क अभियान सुरु केले. त्याच प्रमाणे शेतकरी वर्गात असणारा भाजपचा शोष त्यांनी मत यंत्रात बंधिस्त करण्याची मोहीमच हाती घेतली. हीच व्हिव्ह रचना त्यांच्यासाठी फायद्याची ठरल्याचे चित्र सध्या एक्सिट पोल मधून स्पष्ट झाले आहे.

Exit Poll`s : महाराष्ट्रात युतीला मिळणार एवढ्या जागा तर कॉंग्रेस आघाडी मिळणार दोन आकडी जागा

भाजपचे उमेदवार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे संख्येने अधिक मतदार असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पट्ट्यात अनोळखी होते. त्यांच्या हा अनोळखीपणाचा तोटा भाजपला होण्याची शक्यता आहे. उलट सोलापूर जिल्ह्यातील एकांदा ओळखीचा चेहरा उमेदवार म्हणून या मतदारसंघात दिला असता तर तो उमेदवार संजय शिंदे यांना निश्चित जड गेला असता. मात्र एक्सिट पोल म्हणजे अंदाज असतो. तसेच विजयाचे अंतिम सत्य हे २३ तारखेच्या निकालातूनच बाहेर पडणार आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव