पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद
राज्यांत निसर्गचक्रीवादळाचा फटका साताराजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याला जास्त बसला होता. अडचणीच्या काळात शेतकर्याला न्याय देण्याकरीता सातारा जिल्हा काॅग्रेस युवाअध्यक्ष विराज शिंदे यांनी महसुलमत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री विजय वेटड्डीवार याच्याकडे मागणी केली. महसुल मत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री यांनी दखल घेत मुख्यमत्र्यानी महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाने मदत करण्याचा व तात्काळ प्रस्ताव मान्यतेकरीता सादर केले. महाबळेश्वर तालुक्यांतील १९४ शेतकर्यांना ४९ लाख रुपायाची मदत ठाकरे सरकारने जाहीर केली. विराज शिंदे महाबळेश्वर तालुक्यांतील निसर्गचक्रीवादळातील नुकसान भरपाई करीता व सर्वसामान्य शेतकर्याना मदत मिळवुन देण्याकरीता. विराज शिंदे याच्या प्रयत्नाने महाबळेश्वर तालुक्यांत यश आले आहे.
निसर्गचक्री वादळाने महाबळेश्वर तालुक्यांतील १९४ शेतकर्याच्या घराची पडझड झाली होती . महसुल विभाग ग्रामसेवक , यांचे संयुक्तिक पंचनामे देखील प्रशासनाकडे सादर केले होते .हवालादिल महाबळेश्वर तालुक्याची निसर्गचक्र वादळाने ४७ गावामध्ये नुकसान झाले होते .महाबळेश्वर तालुक्याच्या महसुल विभागाचे पंचनामे सादर केले . पश्चिम महाराष्ट्रातुन महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाचा जोरदार फटका बसला होता . हवालादिल शेतकर्याच्या पाय अगोदरच लाॅकडाऊनमुळे गर्तेत असताना दुष्काळीच तेरावा महीना म्हणुनकी काय निसर्ग चक्रीवादळाने महाबळेश्वर तालुक्याने थैमानामे ४७ गावामधेच १९४ शेतकर्याना नुकसान सोसावं लागले होते . मात्र सातारा जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष विराज शिंदे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत . महाबळेश्वर तालुक्यांला अखेर न्याय मिळाला.
महाविकास आघाडी सरकार कडुन रत्नागिरी , सिधुंदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्याना निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानामुळे त्वरीत मदत पोहोच झाली होती मात्र दुर्गम व डोंगराळ महाबळेश्वर तालुक्यांतील शेतकर्यावर विराज शिंदे यांनी मदतीची अपेक्षा पुर्ण केल्या .त्यामुळे तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकर्यानकडुन समाधान व्यक्त होत आहे .