हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळं राज्य सरकार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. मुख्यमंत्र्यांची पोलीस प्रशासनासोबत बैठक सुरु असून परभणी जिल्ह्यात आधीच या संभावित निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
राज्यात करोनामुळे लॉकडाउन असून सुद्धा लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही आहे. जनता कर्फ्यूची उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेशाला धाब्यावर बसवत लोक आपल्या खासगी वाहनाने रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. अशा परिस्थितीत करोनाचा धोका आणखी वाढविणाऱ्या या गर्दीला थांबवण्यासाठी राज्य सरकार कठोर पाऊल उचलून राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करू शकते. जेणेकरून एका जिल्ह्यातील लोक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार नाहीत. राज्यातील करोनाबाधितांचा संख्या ८९ झाली असताना परिस्थितीत चिंताजनक बनली आहे. म्हणून करोनाच्या फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचं निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना पुन्हा एकदा घरात बसण्याचे, गर्दी टाळण्याचे आवाहन केलं आहे. ‘कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावलं आहे. त्यामुळं केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहनं आणून गर्दी करून कायदा मोडू नका,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.