‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; भगतसिंह कोश्यारी यांचे नवे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यानंतर भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) पुन्हा एकदा आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

.‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरु असताना त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकार रेकॉर्डिंग करीत उभे होते. छायाचित्रकारांच्या मागे एक महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किल प्रश्न विचारला यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर राज्यपाल कोश्यारी म्हणाले कि ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. त्यामुळे त्यांचे हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या