कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर फेकली शाई; सीमावाद चिघळण्याचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्याचे पडसाद आता कर्नाटक आणि महाराष्टाच्या सीमावर्ती भागात उमटले आहेत. कनार्टकातील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रावर एसटीवर काळी शाई फेकली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे म्हटलं जात आहे.

गुलबर्गा येथे महाराष्ट्राच्या सोलापूर-गुलबर्गा एसटी बसवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली आहे. लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई फेकली. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी, कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर कर्नाटकच्या बसवर लावले होते.

16 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत सीमावादावर भाष्य केलं होत. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं होतं. “”कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं,” असं येडियुरप्पा म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment