पै. पृथ्वीराज पाटील बनला यंदाचा महाराष्ट्र केसरी; मुंबईचा बनकर पराभूत

0
137
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी 2022 कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या मल्लानं बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात लढत झाली.

साताऱ्यात अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं अखेरच्या 45 सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीत बनकरनं 4-0 अशी आघाडी घेतली होती. माती व गादी गटाच्या अंतीम सामने रंगतदार झाले. त्यात गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले.

पृथ्वीराज व विशाल यांच्यात उत्कंठावर्धक सामन्यात पृथ्वीरीजने बाजी मारली. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here