महाराष्ट्र केसरी “पृथ्वीराज”ला साताऱ्यातून काही वेळातच 10 लाख अन् बुलेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या 19 वर्षीय पृथ्वीराज पाटीलला स्पर्धा आयोजकांनी कोणत्याही प्रकारचे बक्षीस दिले नसल्याची जाहीर खंत व्यक्त केली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी रोख रक्कम देत मदतीचा अोघ वाढविला आहे. काही वेळातच साताऱ्यातून 10 लाखाची मदत आणि एक बुलेट जाहीर करण्यात आली.

पाटणचे विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वात प्रथम कै. शिवाजीराव चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने 2 लाख तर त्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योग समुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले 5 लाख रूपयांची मदत तातडीने पृथ्वीराजला जाहीर केली आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील रक्षक प्रतिष्ठातर्फे सुशील मोझर यांच्याकडून 1 लाख 51 हजार रूपये आणि कराड तालुक्यातील आटके येथील महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी शनिवारी स्पर्धा संपताच 1 लाखाचा धनादेश सर्वप्रथम पृथ्वीराजला दिला. छ. उदयनराजे भोसले यांनी चक्क बुलेट देणार असल्याचे जाहीर केले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/351210513626745

मल्लाकडून नाराजी व्यक्त होणे साताऱ्याच्या संस्कृतीला न शोभणारे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले 

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे, असे शेवटी आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

Leave a Comment