Wednesday, October 5, 2022

Buy now

गोवा विमानतळावर आयेशा टाकीयासोबत गैरवर्तन अन् नवऱ्याला अश्लील शिवीगाळ; पहा नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकीया आणि तिचा पती फरहान आझमी यांच्यासोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले असून स्वतः फरहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. फरहान यांनी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावेही सांगितली आहेत.

फरहान आझमी, पत्नी आएशा टाकिया आणि त्यांचा मुलगा हे तिघेही गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. मात्र काही दिवसांपूर्वी गोव्याहून मुंबईला परतत असताना अचानक त्यांना गोवा विमानतळावर थांबवण्यात आले. त्यावेळी फरहान यांचे नाव वाचून काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्याच्या कुटुंबापासून वेगळे केले. तसेच त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

एका पुरुष अधिकाऱ्यानं माझ्या बायकोच्या म्हणजेच अभिनेत्री आयेशाच्या अंगाला हात लावला. आणि त्यांना माझ्यापासून दूर केलं. मी जेव्हा त्यांना तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला,ती एक स्त्री आहे,अंतर ठेवून बोला असं म्हटलं तेव्हा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला गेला. बरं यावरचं हे सुरक्षा अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली असेही फरहान आझमी यांनी सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर गोवा विमातळावरील अधिकाऱ्यांनी फरहान आझमी यांची माफी मागितली. त्यावेळी ट्वीट करत म्हटले की, “या प्रवासादरम्यान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल”, असे त्यांनी सांगितले आहे.