जालना प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युती घोषित केली. यामुळे आगामी निवडणुकात हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. मात्र जालन्यात शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील तिढा सुटण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील युती जालन्यात दिसणार की नाही यात शंकाच आहे.
आगामी निवडणुकांमध्ये जालना लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या दोन दिवसात आम्ही भेट घेणार आहोत. जालना लोकसभा मतदारसंघात मी आपली जागा सोडणार नाही असा इशारा खोतकर यांनी दानवेंनी दिला आहे.
आता जालना येथे कोणाला जागा भेटते हे पाहावे लागेल. या दोघांपैकी कोणी माघार घेतली नाही तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे विरुद्ध शिवसेनेचे खोतकर अशी लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
इतर महत्वाचे –
जनहितासाठी शिवसेना-भाजप युती….देवेंद्र फडणवीस
आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल




