सांगली प्रतिनिधी / भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे आणि भाजप सरकार व संजयकाकाच्या कामाची माहिती देणाऱ्या एलइडी चित्ररथाचे उदघाटन केळकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटल चौकातील महाराष्ट्र बॅंकेजवळ संजयकाकांचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयातून प्रचाराची सर्व सूत्रे हलविण्यात येत आहेत.कार्यालय प्रमुख म्हणून नगरसेविका भारती दिगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.कार्यालय उद्धघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,”सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण ३० चित्ररथ आणण्यात आले आहेत.
पक्षाच्या कामाचा यातून परिचय होण्यास मदत होणार आहे.आमचे काम प्रभावशाली आहे.वायफळ बडबड न करता कामातून बोलत असतो. विधानसभेचे काय होणार अशी चर्चा सुरु झाली असून आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही मतदारसंघात कामे केली आहेत. त्यामुळेच नागरिकांचा आमच्यावरविश्वास आहे. त्यामुळेच आम्ही पंचायत समिती, जिल्हापरिषद आणि महापालिकेत सत्ता मिळवली.
पाच वर्षात आम्ही राज्य व केंद्राच्या माध्यमातून मोठी कामे केली असल्याचा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला. यावेळी शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, विवेक कांबळे, श्रीकांत शिंदे, भारती दिगडे, नीता केळकर, छाया हाके, स्मिता पवार, सुनीता मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर महत्वाचे –
लागीर झालं जी या मालिकेतील कलाकारांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक.
विट्यात दीड लाखांची देशी – विदेशी बनावटीची दारू जप्त
अमरावतीत निवडणूक निर्णय अधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा