मुंबई |
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.पण ते खासदारकी चा राजीनामा देणार नाहीत.या आधीही ते स्वतंत्र लढणार होते मात्र भाजपच्या जवळ आल्यावर ते खासदार झाले.पण युती करताना शिवसेनेला त्यांचा विरोध होता.
एकमेकांमध्ये मतभेद असून आता जवळ आलेल्या भाजप-शिवसेना यांची युती झाल्याने राणे आपोआप बाहेर पडणार असंल्याची चर्चा सुरु आहे. आपल्याला भाजपच्या जाहिनाम समितीतून वगकन्यात यावे यासाठी ते भाजप ला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना-भाजप यांची युती होणार हे मला आधीच माहीत होते.
स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या घोषणेचे काय झाले? एक बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे टीका करायची. मातोश्रीच्या स्वार्थ आणि बचावासाठी ही युती केली आहे पण या दोन्ही पक्षांना या युती चा फायदा होणार नाही असे राणे म्हणाले. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत आहे ते पचवण्यासाठी ही युती करण्यात आली आहे असे राणे यांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाचे –
राज्यात युती …..तरी जिल्ह्यात चुरशीची लढत
जनहितासाठी शिवसेना-भाजप युती….देवेंद्र फडणवीस
‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ