नवी दिल्ली प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून पहिल्या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील १६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०१९ रोजी पहिलं मतदान होईल.
महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला १० जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला १४ जागांसाठी आणि चौथा टप्प्यात २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांची नवे –
नागपूर – नितीन गडकरी
नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
नगर – सुजय विखे
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव श्रंगारे
सांगली – संजयकाका पाटील
चंद्रपूर – हंसराज अहीर
इतर महत्वाचे –
उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी
भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…
शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले