वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर होणाऱ्या सध्या प्रचार सभेत नेतेमंडळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. यावेल्ली बोलताना मोदी म्हणाले कि, ‘राष्ट्रवादी पक्ष पवार घराण्याच्या अंतर्गत वादाचा बळी ठरत चालला आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करतात असे बोलले जाते. त्यांनी या आधी पंतप्रधान होण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचे काय झाले असे म्हणून शरद पवार यांना नरेंद्र मोदींनी चांगलाच चिमटा काढला.
वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेमध्ये मोदी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर झडप मारली असून शरद पवार यांना त्यांच्या पुतण्यानेच हिट आउट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवारीचे वाटप करण्याला सुद्धा द्विधा निर्माण झाली आहे. तसेच जनतेमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादीच्या रोषामुळेच शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
काँग्रेसचे लोक स्वच्छ भारत अभियानाची थट्टा उडवली मात्र त्यांनी मला लाख शिव्या द्याव्या. त्यांच्या शिव्या माझ्यासाठी दागिने आहेत. कारण माझे स्वच्छ भारत अभियान भारतातील माता भगिनींच्या सन्मानाचे अभियान आहे. कारण त्यांना उघड्यावर स्वच्छाला जायला काय त्रास पडत होता याची मला जाणीव होती. म्हणून मी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
इतर महत्वाचे –
मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली
आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार
या कारणामुळे उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची ‘पप्पी’