मुंबई प्रतिनिधी | माढ्यातील विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. त्याचबरॊबर राष्ट्रवादीच्या खासदाराचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदार संघासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत होते, मात्र रंजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले राजकीय खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने बोलून दाखवला होता.
माढा लोकसभा मतदार संघात सुरु असलेल्या वादामुळे स्वत: विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना माढातून निवडणूक लढण्यास सांगितलं होतं, मात्र काल कौटुंबिक कारण देत शरद पवार यांनी माढातून माघार घेत असल्याचे सांगितले.
इतर महत्वाचे –
सुजय विखे-पाटलांचा आज भाजप प्रवेश
आशा वर्करची लेक झाली पोलीस उपनिरीक्षक
रायगडाला जेंव्हा जाग येते… पुण्याचा ‘ श्रीश ‘ बनला छत्रपती राजाराम महाराज