पुणे प्रतिनिधी | पुणे पोलिसांनी कर्णबधिर तरुणांवर केलेल्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांनी दाखल घेऊन पुणे पोलीस आयुक्तांना या हल्ल्याबाबत सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्णबधिर आंदोलकांची भेट घेतली. या तरुणांचे प्रश्न ऐकून घेऊन आम्ही सरकारला या बाबत जाब विचारू असे आश्वासन त्यांनी या तरुणांना दिले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे फडणवीस सरकार नाही तर जनरल डायर सरकार असल्याची टीका त्यांनी केली.ज्यांना आवाज नाही अशांवर हल्ला करणे ही घटना लाजिरवाणी आहे. सरकारने २४ तासाच्या आत उपाय केला नाही तर मी स्वतः उपोषणाला बसेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली
ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही त्यांच्यावर लाठीहल्ला कसा करू शकतात? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. सरकारला या मुलांनाच शाप लागेल अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. विरोधकांसह सामान्य नागरिकही या हल्ल्याचा निषेध सोशल मीडिया वरून करीत आहेत. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात या घटनेवरून विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाचे –
‘यांची’ आश्वासने म्हणजे ‘लबाड घरच आवताण’ – शरद पवार
पुण्यात कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
सामान्य लोकांबरोबरच सैनिकांच्या पाठीशी देखील मी ठामपणे उभा – उदयनराजे भोसले