आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातील या दौऱ्यात मोदी सर्वप्रथम वर्धा येथे भेट देणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी वर्धा येथे येऊनही वर्ध्यातील सेवाग्रामला भेट देणार नाहीत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील राजकीय नेते देशभरात प्रचार सभा घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज एक एप्रिलपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मोदींच्या विविध ठिकाणी आठपेक्षा जास्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची पहिली सभा वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर होणार आहे.

महाराष्ट्रातील वर्धा येथे येऊनही नरेंद्र मोदी सेवाग्राम येथील गांधी आश्रमात भेट देणार नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदींनी सेवाग्राम गांधी आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र यावेळी ते सेवाग्रामला जाणार नसल्याचे समजते आहे.
इतर महत्वाचे –

…म्हणून मित्रानेच जाळले मित्राच्या बायकोला

जेव्हा बिबट्या पोल्ट्रीत शिरतो …

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

उदयनराजेंविरोधात लढणार्‍या नरेन्द्र पाटीलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान