पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातील चाकण येथे आयोजित सभेतून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, यशवंत चव्हाण यांचा वारसा आत्तापरेंत आम्ही चालवला, मात्र अजून २५ वर्षे हा वारसा चालविण्यासाठी नवीन पिढीची गरज आहे. नवीन पिढी घडविण्यासाठी आगामी निवडणूक महत्वाची ठरेल.
‘माझी छाती ५६ इंचाची नाही, पण माझ्या मनगटात दम आहे. त्यामुळे राज्यसभेत तर मी एकटाच पुरेसा आहे, त्याच बरोबर देशात देखील मी बदल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ असे शरद पवार म्हणाले. या सभेत अजित पवार म्हणाले की, ‘साहेब या वयात फिरत आहेत.’ यावर पवार म्हणाले की, ‘हे वाक्य मला अजिबात आवडले नाही. मी काय म्हातारा झालोय व्हय?’
तरुण वयात संधी मिळणं चांगलं असत पार्थला ती मिळाली आहे, त्याच्या कडून या संधीच सोन करून घेतलं जाईल असे पवार म्हणाले. मलाही तरुण वयात असताना अशा संधी मिळाल्या होत्या.
इतर महत्वाच्या –
गोव्यात काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा…
अहमदनगरमध्ये राजकीय कुरघोडी, शंकरराव गडाख यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती
कराड पोलीसांची धडाकेबाज कारवाई, बँकेवर दरोडा टाकणार्या त्या पाच जणांना तीनच दिवसात केले जेरबंद