हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी 48 तासांमधील असणं आवश्यक आहे. ज्या राज्यांना अतिसंवेदनशील घोषित केले आहेत तेथील प्रवाशांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे नियम लागू असतील.
माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये चालक, क्लिनर या दोघांशिवाय इतरांना प्रवास करण्यावर बंदी आहे. जर माल वाहतूक इतर राज्यातून महाराष्ट्रात होत असेल तर त्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देणं बंधनकारक.
🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021
अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)
१) किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11
३) भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11
4) फळे विक्री- सकाळी 7 ते 11
5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11
6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11
7) पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11
8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11
9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11
10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.