माढा : भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका : मराठा क्रांती मोर्चा

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी |कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपला मराठा क्रांती मोर्चाने मोठी  आडकाठी केली आहे. माढा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करू नका असा फतवाच मराठा समाजासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढला आहे.

गुरसाळे येथील भाजपच्या सभेत मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सरकारी मदत कधी देणार आणि आरक्षणाच्या आंदोलनात १४०० मराठा युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते कधी कधी मागे घेणार हे भाजप उमेदवाराला विचारणाऱ्या राजाभाऊ गायकवाड यांना सभा स्थळी धमकावण्यात आले. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली असा दावा स्व:ता राजाभाऊ गायकवाड यांनी केला आहे. राजाभाऊ गायकवाड हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहेत.

अशा सर्व परिस्थितीत मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या भूमिकेचा भाजपच्या उमेदवाराला किती तोटा होतो हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या या भुमीकेमुळे भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे हे मात्र निश्चित आहे.

माढा लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

राहुल गांधीच्या उमेदवारीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला अंतिम निर्णय

Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा

भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजप कडून असे उत्तर..

शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे