मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बारामती मतदारसंघाच्या निकालाबद्दल हे सूचक विधान केले आहे. भाजपने यावेळी निववडणुकीत बारामती जिंकण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र त्यांचे बारामती जिंकण्याचे दावे हे ईव्हीएम छेडछाडीवर आधारित होते का असे धक्कादायक विधान करून शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच प्रश्न चिन्ह उभा केले आहे.
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन चांगलीच लढत दिली होती. मतदानानंतर सुप्रिया सुळे यांच्या पराभवाचीच चर्चा खुद्द मतदार करू लागले आहेत. त्यामुळे लोकांनी नेमका कौल कुणाच्या पारड्यात टाकला आहे आहे हे २३ मे रोजी समजणार आहे.
हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार येणार आमनेसामने
एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आपले ईव्हीएम मशीन बद्दलचे मत व्यक्त केले आहे. शरद पवार एवढेच बोलून थांबले नाहीतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. ज्यांनी कधीच सार्वत्रिक निवडणुका लढवल्या नाहीत ते बारामती जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यावर आधारित असावा असे शरद पवार म्हणाले आहेत. ईव्हीएम मशीन मध्ये एकदा व्यक्ती छेडछाड करून लोकसभेत निवडून जाईल मात्र लोकांचा लोकशाही प्रक्रिये वरील विश्वास उडत जाईल असे चिंताजनक विधान शरद पवार यांनी केले आहे.
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज
शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील
दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी
१ मे : म्हणून या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिन
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन