प्रतिभा पाटील यांचा मुलगा लावतोय कॉंग्रेसच्या ‘या’ आमदाराला पराभूत करण्याची फिल्डिंग

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | कॉंग्रेसचे माजी आमदार आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत  यांच्यातील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यातील फोन संभाषणाची ओडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात रावसाहेब शेखावत आपल्याच पक्षाच्या आमदार  यशोमती ठाकूर  यांना पराभूत करण्यासाठी फिल्गिंग लावत आहेत असे त्यांच्या संभाषणातून स्पष्ट होते आहे.

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांना पडण्यासाठी रावसाहेब शेखावत प्रयत्न करत आहेत. यशोमती ठाकूर या विदर्भातील कॉंग्रेसच्या एकमेव महिला आमदार आहेत. जन्सामान्याशी जुडलेली नाळहा त्यांची राजकारणाचा गाभा आहे. व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून त्या दोन वेळा विधानसभेत निवडून गेल्या आहेत.

दिनेश सूर्यवंशी यांनी हा ओडीओ क्लिपमधील आवाज आपलाच असल्याची कबुली दिली आहे. मात्र दुसरा आवाज कोणाचा  आहे हे सांगण्यास दिनेश सूर्यवंशी यांनी  नकार दिला आहे. तर रावसाहेब शेखावत यांनी हा आवाज आपला नसल्याचे म्हणाले आहे. यशोमती ठाकूर यांचा पराभव करण्यासाठी आपण ५ कोटी खर्च करण्यास देखील तयार आहे असे रावसाहेब शेखावत यांनी यात ओडीओ क्लिपमध्ये म्हणाले आहे.