मुंबई प्रतिनिधी |राज्यात गतवेळी पेक्षा या वेळी जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या सेना भाजपला राज्यात धक्कादायक निकालांनी सामोरे जावे लागू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असाच धक्कादायक निकाल नाशिक लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता समोर येते आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चांगलीच लढत दिल्याचे बोलले जाते आहे. या लढतीत भुजबळ गोडसेंना चितपट करतील अशा चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यात रंगात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी
नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक शहराचे तीन विधानसभा मतदारसंघ तसेच देवळाली , सिन्नर आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शहरी भागात भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तगडी ताकद असल्याने शहरात शिवसेनेच्या उमेदवारावाला निर्णायक मते मिळतात. मात्र ग्रामीणला राष्ट्रवादीची बांधणी चांगली असल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा बोलबाला अधिक असतो. २०१९ ची निवडणूक मात्र या समीकरणाला अफवाद ठरताना दिसत आहे. कारण शहरी भागात देखील धनुष्यबाण क्षीण पडल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शहरी भागात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच राज ठाकरे यांनी राजकारणात “लाव रे तो व्हिडीओ” च्या माध्यमातून केलेली दमदार वापसी यामुळे त्यांच्या मागे असणारा शहरी मतदार देखील राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या पारडयाता जाऊन पडला. त्यामुळे शिवसेनेची वाटचाल पराभवाकडे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री
कांदा उत्पादक तालुका म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नरमध्ये शेतकरी वर्गात सरकार बद्दल रोष होता. कारण मोदी सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्ठा भोगाव्या लागल्या आहेत. मोदी सरकारच्या पाचही वर्षांत कांद्याला नमिळालेला दर हा शेतकरी रोषाचे मुख्य कारण होते म्हणून या मतदारसंघात शेतकरी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहण्याची दाट शकता आहे.
धक्कादायक! पोलीसांच्या हाप्त्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव सेनाभाजप नेत्यांच्या नजरेच्या टप्प्यात आल्यानेच ऐनवेळी नरेंद्र मोदींची सभा घेण्याचा निर्णय घेतला गेला अशीही या मतदारसंघात चर्चा आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सभेतून मतदार उठून निघून गेल्यावरच येथील जनता सरकारवर किती मोठ्या प्रमाणात नाराज आहे याचा प्रत्येक आला होता. तोच जनक्षोभ जनतेने मतदानातून दाखवून दिला आहे असे म्हणायला येथील राजकीय वातावरण वाव देते आहे. म्हणून एकंदर परिस्थिती बघता शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात धक्कादायक पराभव पत्करावा लागण्याची शक्यता गडद आहे. मात्र तूर्तास २३ मेपर्यंत निकालाची वाट बघावी लागणार आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज
Supriya Sule यांच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता